कार्यप्रणाली

तथास्तु वॅाटर सॅाफ्टनर हे पाण्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजेच कार्बोनेट, सोडीअम, क्लोराईड ह्यांच्या बरोबर संयुग झालेल्या कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सोडीअम सल्फेट आणि बोरॅन सारख्या क्षारांचे विघटन करण्यास कार्यक्षम आहे. जमिनातील क्षार, खनिजे जेव्हा पावसाच्या पाण्याच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांचा संयोग होऊन त्याचे छोट्या क्षारयुक्त कणांमध्ये रुपांतर होते. ह्या कणांमध्ये चिकटपणा तयार होऊन ते एकमेकांना आकर्षित करत क्षारयुक्त थरांमध्ये किंवा जमिनीवर पांढ-या रंगाचा चुनखडीचा थर जमा होऊन जमिन कडक होते.

संशोधनाव्दारे असे आढळून आले आहे की, बदलत्या स्वरुपाचे जलद गतिच्या विद्दुतचुंबकीय लहरींमुळे क्षार व खनिजांचे पाण्यामधिल होणारे संयोगिकरण थांबवून क्रिस्टल तयार होण्यास प्रतिबंध केला जातो. तथास्तु कंपनीने जर्मनमधील पाणी संशोधन कंपनीबरोबर संशोधन करुन पाण्याचा टीडीएस (TDS), पाईपाचे आकारमान, पाण्याचा वेग आणि वापरला जाणारा पाईपाचा प्रकार या सर्व प्रमाणांच्या आधारावर विविध प्रकारची 16 मोडेल्स घरगुती, शेती आणि औद्दोगिक वापरासाठी बनवलेली आहेत. पाण्यात झालेल्या बदलांचे प्रमाणपत्रे तथास्तु कंपनीने खात्रीपुर्वक तपासुन घेतलेले आहेत.

तथास्तु वॅाटर सॅाफ्टनर हे एक इलेक्ट्रॅनिक उपकरण असुन त्यामधुन निघणारी वायर पाईपच्या वरच्या भागावर विशिष्ट प्रकाराने गुंडाळली जाते. त्या वायर्स मध्ये इलेक्ट्रॅनिक उपकरणाच्या साहाय्याने असंख्य विद्दुत चुंबकीय लहरींची निर्मिती केली जाते. जेव्हा पाईपच्या मधून पाण्याचा प्रवाह वाहतो तेव्हा अति तीव्र बदलत्या स्वरुपाच्या विद्दुत चुंबकीय लहरींची मारामुळे पाण्यातील क्षारांचे विघटन होऊन परस्परांमध्ये आकर्षण होण्याची तसेच संयुगीकरणाची प्रवृत्ती नष्ट होते. अशाप्रकारे पाण्याचे जडत्व कमी होऊन पाण्याची द्रावण क्षमता वाढते. तसेच पाण्याच्या चवीमध्ये सुधारणा होऊन पाण्यातील ओक्सीजनचे प्रमाण वाढते. पाण्याच्या पाईपभोवती गुंडाळलेल्या वायर्स कॅईलसची रचना हे त्या क्षेत्रामधील पाण्याचा टीडीएस, पाईपचा आकार, आणि पाण्याचा वेग यांवर अवलंबून असतो.